Maldive Politics : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी

राष्ट्राध्यक्ष मुइज्जू

माले (मालदीव) – भारतासमवेतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी होऊ लागली आहे. ‘मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी’ या विरोधी पक्षाचे नेते अली अझीम यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले आहे की, आपल्याला देशाचे परराष्ट्र धोरण सशक्त ठेवावे लागेल.

‘मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी’ या विरोधी पक्षाचे नेते अली अझीम

आपले शेजारील देशांशी असलेले संबंध तुटण्यापासून वाचले पाहिजे.’ पुढे त्यांनी स्वतःच्या पक्षालाच विचारले, ‘मुइज्जू यांना हटवण्यास सिद्ध आहात का ? ‘मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी’ मुइज्जू यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणेल का ?