Bangladeshi Hindu Murder : बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगच्या हिंदु कार्यकर्त्याची हत्या !

बोरून घोष, सत्ताधारी अवामी लीगचे कार्यकर्ते आणि पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील जेनैदाह जिल्ह्यातील घोषपारा भागात ९ जानेवारी या दिवशी अज्ञातांनी बोरून घोष या हिंदु तरुणाला घरातून बाहेर काढले आणि त्याची हत्या केली. घोष यांचे प्रथम पाय कापण्यात आले आणि नंतर हत्या करण्यात आली. हत्येनंतर सर्व आरोपी पळून गेले. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. घोष सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत घोषपारा येथे अवामी लीगचा पराभव झाला होता.

अवामी लीगचे येथील उमेदवार सामी यांनी सांगितले की, राजकीय कारणामुळेच घोष यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या हत्येचा उद्देश अद्याप समजू शकलेला नाही.

संपादकीय भूमिका

पंतप्रधान शेख हसीना स्वतःच्या पक्षाच्या हिंदु कार्यकर्त्याचे रक्षण करू शकत नाहीत, तेथे त्या देशातील अन्य हिंदूंचे रक्षण कसे करणार ?