सातारा येथे वाळू तस्करांची ८० वाहने शासनाधीन !

वाळू तस्करांवर जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाळू तस्करांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद असून त्यांची ८० हून अधिक वाहने पोलिसांनी कह्यात घेतलेली आहेत.

Goa Drugs Racket : गोवा – ‘अपना घर’मधील मुलाने धमकी दिल्याची महिला अधिवक्त्यांची पोलीस ठाण्यात तक्रार !

गोवा सरकारच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे अमली पदार्थ आढळल्याच्या तक्रारी आहेत, तसेच ‘अपना घर’मधील कर्मचार्‍यांनी या प्रकरणी संबंधितांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. ‘अपना घर’मध्ये मुलांचे पुनर्वसन होत नसल्याचे हे दर्शक ! हे प्रशासनाला लज्जास्पद !

DMK Minister Threatens PM : (म्हणे) ‘मी मंत्री नसतो, तर पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते !’ – द्रमुक सरकारचे मंत्री टी.एम्. अंबरसन

या उलट जर भाजपच्या एखाद्या मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात असे विधान चुकून जरी केले असते, तर याच लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आकांडतांडव केला असता ! या विधानाचा विरोधी पक्षांतील एकाही राजकारण्याने निषेध केलेला नाही !

पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांचे निलंबन मागे घ्या !

देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !

Goa Rental Vehicles Accidents : गोव्यात भाडेतत्त्वावर वाहने घेतांना वाहतूक नियमांच्या हमीपत्रावर स्वाक्षरी आवश्यक !

गोव्यात होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अपघातांची नेमकी कारणे काय, याचाही अभ्यास केला जात आहे. हे हमीपत्र भरून घेण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे असेल.

सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत ! – विनायक येडके, अध्यक्ष, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना

सांगली येथे अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असतांना ते बंद करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील संबंधित अधिकार्‍यांनाही हे लक्षात येत नाही का ?

Goa Drugs In Apna Ghar : गोवा शासनाच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे आढळले अमली पदार्थ !

महिला आणि बाल कल्याण विभाग किंवा पोलीस खाते यांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ‘अपना घर’मधील कर्मचार्‍यांनी केली आहे, तसेच मुले अमली पदार्थाच्या सेवनामुळे हिंसक बनत आहेत का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Canada Khalistan Protest : कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी खलिस्तान्यांनी आणले होते तलवारी आणि भाले !

खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?

अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतील काही रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांना दिल्याची कर्जदार वैकर यांची माहिती !

अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतून २० लाख रुपये बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख रूपात देऊन १० लाख रुपये बँकेचे अधिकारी हेमंत बल्लाळ यांना दिल्याची कबुली अविनाश वैकर यांनी पोलीस अन्वेषणात दिली.