Pakistan Terrorist Killed : पाकिस्तानमध्ये अज्ञातांकडून आणखी एका आतंकवाद्याची हत्या !

आतंकवादी कारी एजाज आबिद

पेशावर (पाकिस्तान) – येथील पिसखरा भागातील मशिदीतून बाहेर पडत असतांना अज्ञात आक्रमणकर्त्यांनी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा नातेवाईक असणारा आतंकवादी कारी एजाज आबिद याला गोळ्या झाडून ठार मारले. या गोळीबारात कारी एजाजचा जवळचा सहकारी कारी शाहिद हा गंभीररित्या घायाळ झाला.

१. कारी एजाज हा ‘अहले सुन्नत वाल जमात’ नावाच्या संघटनेचा सदस्य होता. तो ‘खत्म-ए-नबुवत’ नावाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा प्रांतीय नेतादेखील होता. तो त्याच्या संघटनेच्या माध्यमातून जैश-ए-महंमदसाठी आतंकवाद्यांची भरती करायचा.

२. आतंकवादी मसूद अझहरच्या योजनेनुसार कारी एजाज प्रथम तरुणांना त्याच्या संघटनेच्या मेळाव्यात बोलावत असे. मग हळूहळू तो त्यांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी करून घ्यायचा. तो तरुणांना शस्त्रे आणि स्फोटके यांचे प्रशिक्षण देण्यासाठी जैश-ए-महंमदच्या छावण्यांमध्ये पाठवत असे.