
नवी देहली – भारतात वर्ष २०२३ मध्ये अनुमाने १९ सहस्र गर्भवती महिलांचा मृत्यू झाला. म्हणजेचे प्रतिदिन सरासरी ५२ महिलांचे प्राण गेले. हे प्रमाण जगात गर्भवतींच्या होणार्या एकूण मृत्यूंपैकी ७.२ टक्के आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात देण्यात आली आहे. अशा मृत्यूंमध्ये नायजेरियानंतर भारताचा क्रमांक आहे.
१. जगात प्रत्येक २ मिनिटांनी एक महिला गर्भधारणा किंवा प्रसूती यांच्याशी संबंधित समस्यांमुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
२. या अहवालानुसार, वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये ११ सहस्र गर्भवती महिलांचे मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ प्रतिदिन सरासरी ३० मृत्यू झाले आहेत.
३. नायजेरियामध्ये ७५ सहस्र महिलांचा मृत्यू झाला. हे जगातील गर्भवती महिलांच्या एकूण मृत्यूंपैकी २८.७ टक्के आहे.
४. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयसस म्हणाले की, या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गर्भवती महिलांसाठी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमध्ये वेगाने सुधारणा झाली नाही, तर हे संकट आणखी गंभीर होऊ शकते.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !