कोल्‍हापूर येथे ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवेच्‍या आगाऊ तिकीट विक्रीस प्रारंभ ! 

नवरात्रीच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर महापालिकेच्‍या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवा १५ ते २३ ऑक्‍टोबर या कालावधीत भाविकांसाठी चालू होत आहे.

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मंदिरांमध्ये जाणारे राहुल गांधी याविषयी बोलतील का ? कि ‘जेथे मुसलमानबहुल असतात, तेथे हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या सांगण्यानुसार वागावे’, असेच गांधीवाद्यांना वाटते का ?

पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील सार्वजनिक नवरात्रोत्‍सवात धार्मिकतेसह सामाजिक उपक्रम !

श्री महालक्ष्मी मंदिर, ‘श्री बन्‍सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्‍कृतिक ट्रस्‍ट’च्‍या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्‍सवाचा प्रारंभ १५ ऑक्‍टोबरपासून होणार आहे. १५ ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन मंदिरात करण्‍यात आले आहे.

नवरात्रोत्‍सवाच्‍या निमित्ताने १५ ते २३ ऑक्‍टोबर कुंकूमार्चन महाचंडी यज्ञ !

मिरजकर तिकटी येथे असलेल्‍या श्री एकमुखी दत्त देवस्‍थान येथे गेली ८ वर्षे शारदीय नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्‍यात येत आहे.

नवरात्रीच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर महापालिकेच्‍या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवा !

नवरात्रीच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर महापालिकेच्‍या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवा १५ ते २३ ऑक्‍टोबर या कालावधीत भाविकांसाठी चालू करण्‍यात येणार आहे.

नवरात्रोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्‍या स्‍वच्‍छतेस प्रारंभ !

कोल्‍हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दर्शनासाठी भाविक केवळ महाराष्‍ट्रच नव्‍हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तसेच अन्‍य राज्‍यांतूनही मोठ्या प्रमाणात येतात. आता सर्वसाधारणपणे प्रतिदिन ५ सहस्र भाविक दर्शन घेत आहेत. नवरात्रात हा आकडा लाखात जातो. त्‍यामुळे यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

‘१५.१०.२०२३ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.

Navratri :  करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी

करवीर (कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. श्री महालक्ष्मीदेवीचे हे स्थान आजही जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.

Navratri : जगत्पालक आद्याशक्ति

नवरात्रीतील पहिले ३ दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे ३ दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे ३ दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

Navratri : नवरात्रीत कुंकुमार्चन कसे कराल ? 

‘देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणांवर वाहतात.’