नवरात्रोत्सव ! आदिशक्तीची उपासना करण्याचे हे ९ दिवस हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असतात. देशातील वेगवेगळ्या प्रांतांत विविध पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. बंगालमधील दुर्गापूजा, गुजरातमधील गरबा; महाराष्ट्रातील घटस्थापना, घागरी फुंकणे, कुमारिकापूजन हे त्या त्या प्रांतातील नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
या धार्मिक कारणाने उत्साहपूर्ण वातावरणात ज्या प्रकारे धार्मिकतेचा प्रसार होतो, त्याचप्रमाणे अधर्मी प्रवृत्तींचेही फावते. याच काळात ठिकठिकाणी गरब्यांचेही आयोजन केले जाते; परंतु सध्याच्या काळात गरबा किंवा दांडिया यांची प्रथा-परंपरा धार्मिक स्तरावर पाळली न जाता तिला वेगवेगळ्या घटनांमुळे अनेकदा गालबोट लागते. नवरात्रोत्सवाच्या पावन काळात होणारे अपप्रकार स्वतः जाणून घेऊन ते रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हीसुद्धा आदिशक्तीची उपासनाच आहे.
१. चित्रपटातील गाण्यांवर नाचणे म्हणजे गरबा नव्हे !
सध्या गणेशोत्सवाप्रमाणे गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव मंडळे चालू झाली आहेत. अनेक ठिकाणी मंडळे नसली, तरी गरबा आणि दांडिया यांचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा हा एक ‘इव्हेंट’ (उपक्रम) झाला असून त्यासाठी ५०० रुपयांपासून सहस्रो रुपयांपर्यंतची तिकिटे लावून त्याचे आयोजन केले जाते. तरुण-तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये एकमेकांशी स्पर्धा आणि मौजमजा करत चित्रपटातील गाण्यांवर गरबा खेळतात, त्यात देवीप्रती भावभक्ती नसते. काही ठिकाणी चित्रपट अभिनेते, अभिनेत्री गरब्यामध्ये सहभागी होतात. त्या वेळी केवळ त्यांना पहाण्यासाठी झुंबड उडालेली पहायला मिळते. उत्कृष्ट वेशभूषा, आकर्षक जोडी, ‘दांडिया किंग’, ‘दांडिया क्विन’, अशा विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे असे म्हणावे लागते की, सार्वजनिक ठिकाणी साजरा होणारा नवरात्रोत्सव हा केवळ दिखावा करण्याचा भाग झाला असून दुर्दैवाने याविषयी कुणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही. ‘हाच उत्सवांमधील आनंद आहे’, असा अपसमज आजच्या पिढीच्या अंगवळणी पडत आहे. यामुळे देवीची भक्ती नाही, तर आपण केवळ मौजमजा करत आहोत, याचे भान कुणाला नाही.
नवरात्रोत्सवही धार्मिक पद्धतीने साजरा होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. या उत्सवात शिस्त, संस्कृती आणि शुचिता यांचे पालन व्हायला हवे. प्रत्येक हिंदूचा त्याकडे कटाक्ष असायला हवा. मंडपात गरब्याच्या वेळी चित्रपटांतील अश्लील गाणी न लावता धार्मिक गाणी लावावीत. यातूनही बर्याच गोष्टी साध्य होऊ शकतात.
२. उघड्या पाठीवर टॅटू गोंदवणे, हा धर्मशिक्षणाचा अभाव !
गेल्या काही वर्षांत आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु युवतींनी पाठीवर देवीचे किंवा गरबा खेळतांनाचे चित्र रंगवून घेतलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होतांना दिसत आहेत. हिंदु धर्मात ‘स्त्री’ला देवी, माता यांच्या रूपात पहाण्याचे संस्कार आहेत. भारतीय महिलांनी सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा इतिहास घडवला आहे. त्यांनी प्राणांचे बलीदान दिले; पण आपल्या देहाची विटंबना होऊ दिली नाही. असे असले, तरी आज आपण काय पहातो ? ‘देहाचे प्रदर्शन करणे’, हेच बर्याच महिलांना भूषणावह वाटते. युवती त्यांच्या पाठीवर देवीचे चित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. ‘ज्या देशातील सहस्रो राजपूत स्त्रियांनी जोहार केला, त्याच देशातील महिला अशा प्रकारे अंगप्रदर्शन करून मुसलमानांना त्यांची उघडी पाठ गरब्याची चित्रे रंगवण्यासाठी देत आहेत’, हे बघून पुष्कळ दुःख वाटते. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ? त्यांना धर्मशिक्षण आणि धर्माचा इतिहास न शिकवला गेल्यामुळेच धार्मिक उत्सवांतील असे अपप्रकार वाढले आहेत.
३. धर्मांधांचा गरबास्थळी वावर
गेली अनेक वर्षे नवरात्रोत्सवानंतर एक धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे. ‘नवरात्रीच्या काळात गर्भनिरोधकांची किती विक्री वाढली’, हे ते सर्वेक्षण सांगतो. गुजरातमध्ये गर्भनिरोधकांची विक्री वाढण्याची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली चालणारे हे विकृत प्रकार निश्चितच धक्कादायक आहेत. याच वातावरणाचा अपलाभ घेऊन धर्मांध तरुणही गरबा खेळण्याच्या निमित्ताने हिंदूंच्या धार्मिकस्थळी प्रवेश करतात. हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे त्यांना जिहादी कारवायांमध्ये गुंतवतात.
याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रतिवर्षी मागणी करतात, ‘गरबा कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदु धर्मियांनाच प्रवेश द्यावा.’ खरे तर अशी मागणी करण्याची वेळच यायला नको. गरबा आयोजक आणि गरबा खेळणारे हिंदू यांनीच मुसलमानांना प्रवेश नाकारायला हवा; पण तसे होत नसल्याने मागणी करण्याची वेळ येते.
हिंदूंवर ओढवलेली संकटे, त्यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचार या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरब्यासाठी दिलेला हा पर्याय योग्यच आहे. त्यातून ‘लव्ह जिहाद’, मुलींची छेड काढणे आणि विनयभंग या अपप्रकारांना आळा बसेल; कारण हे अपप्रकार सर्वाधिक प्रमाणात धर्मांधांकडूनच केले जातात. गरब्यात नृत्य करणार्या अल्पवयीन मुली किंवा तरुणी यांच्यावर वासनांधांची दृष्टी असते अन् त्यांच्या जाळ्यात त्या नकळतपणे ओढल्या जातात आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते. त्यामुळे या मागणीचा पुनरुच्चार होत आहे.
४. हिंदु स्त्रीने महिषासुरमर्दिनी व्हावे !
प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत आणि त्यात हिंदु मुलींना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे त्याला आळा बसायलाच हवा. बरे, आता प्रवेश नाकारला; म्हणून धर्मांध काही केल्या शांत बसणार नाहीतच. गरबा महोत्सवाच्या बाहेरच्या बाजूला वस्तू किंवा खाद्यपदार्थ यांची दुकाने थाटून त्या माध्यमातून ते स्वतःचा सुप्त हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित ! हे लक्षात घेऊन गरब्यातच नव्हे, तर गरब्याच्या आसपासही धर्मांधांना फिरकायला दिले जाऊ नये. हिंदु मुली आणि तरुणी यांनीही धर्मांधांच्या प्रलोभनांना न जुमानता वेळप्रसंगी काली, दुर्गा किंवा चंडिका यांचे रूप घ्यावे. देवीचा जागर आणि तिची उपासना करून आपण देवीसमान सामर्थ्यशाली होऊया’, हा संकल्प नवरात्रोत्सव काळात प्रत्येक हिंदु तरुणी आणि स्त्रिया यांनी करायला हवा. प्रत्येकच हिंदु स्त्री वासनांध धर्मांधांच्या संदर्भात महिषासुरमर्दिनी झाली, तर ‘लव्ह जिहाद’च्या राक्षसाला ती केव्हाच नष्ट करील, हे लक्षात घ्या. हिंदु स्त्री धर्मांधांच्या तावडीत सापडू नये, यासाठी हा खटाटोप केवळ ९ दिवसच न करता वर्षभर प्रत्येक स्त्रीने यादृष्टीने सजग रहायला हवे.
गरबा ही नवरात्रोत्सवातील देवीचीच उपासना आहे, हे लक्षात घेऊन त्याचे पावित्र्य रक्षण करूया. एकदा त्याचे बाजारीकरण थांबवले की, त्या माध्यमातून जिहादी कारवाया करणार्या धर्मांधांनाही आपोआपच आळा बसेल !
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (३०.९.२०२४)