शाळा विलीनीकरणाचे ‘मध्यप्रदेश मॉडेल’ देशभरात लागू करणार ! – नीती आयोग

देशभरातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच अल्प शिक्षकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाने महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. आयोगाने सर्व राज्यांना उद्देशून म्हटले आहे की, मध्यप्रदेशचे ‘एक शाळा-एक परिसर’ हे ‘मॉडेल’ देशभरात लागू केले जाऊ शकते.

इस्रायलच्या आक्रमणास आम्ही नेहमीच विरोध केला ! – काँग्रेस

‘पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलला विरोध’ हे काँग्रेसचे नेहमीचेच धोरण  असून यामागे मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हेच एकमेव कारण आहे, हे जगजाहीर आहे. काँग्रेसला उतरती कळा लागली असतांनाही तिला हे उमगत नाही, हे तिचे दुर्दैव नि देशाचे सुदैव, हे मात्र खरे !

शाळांमध्ये रामायण आणि महाभारत शिकवणार नाही ! – ‘एन्.सी.ई.आर्.टी.’

अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होऊन काही दिवस झाल्यानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला आता जाग आली का ? या संदर्भात केंद्र सरकारने देशातील १०० कोटी हिंदूंना योग्य स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !

Bala Rane In Last Video : पोलिसांच्या आश्वासनानंतर कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील बाळा राणे यांचे उपोषण स्थगित

‘दावत-ए-इस्लामी’ या पाकिस्तानधार्जिण्या संस्थेच्या हालचाली थांबवण्यासाठी, झोपलेल्या पोलिसांना जागे करण्यासाठी कुडाळ येथील बाळा राणे यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी आपल्या निवासस्थानी ‘बाळाचे अंत्यदर्शन उपोषण’ चालू केले होते.

Banish ‘Sunburn’ Festival Totally From Goa ! : ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे.

उत्तरकाशीच्या बोगद्यातील खोदकाम अंतिम टप्प्यात !

६-६ मीटरचे ३ पाईप टाकायचे काम शेष आहे. एक पाईप टाकण्यासाठी अनुमाने ४ घंटे लागतात. १८ मीटर खोदल्यानंतरच बचावकार्य चालू होईल.

गुप्तचर यंत्रणांकडून भारतातील ‘हमास योजने’चा पर्दाफाश !

भारत आणि बांग्लादेश येथून १२ तरुणांना पाकव्याप्त काश्मिरात १० दिवसांचे आतंकवादी प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तान, तुर्कीये मार्गे पॅलेस्टाईनला पाठवण्यात आले.

आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही ! – अभिनेत्री ईशा तलवार

असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !

जाजपूर (ओडिशा) येथील शाळेत उठाबशा काढण्याची शिक्षा केल्यामुळे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

जाजपूर येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गातील एका मुलाला शिक्षा म्हणून उठाबशा काढण्यास सांगण्यात आले होते. उठाबशा काढतांना हा मुलगा बेशुद्ध पडला.

लाच म्हणून प्रशिक्षण विमाने घेणारे उड्डाण आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक निलंबित !

‘लाचखोरीचे विविध प्रकार’ नावाने भारतात एक पुस्तक छापता येऊ शकते, असेच यावरून वाटते ! अशा लाचखोरांना फाशीची शिक्षा करणारा कायदा करणे आता क्रमप्राप्त झाले आहे !