नवी देहली – नागरी विमान महासंचालनालयाच्या उड्डाण आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक कॅप्टन अनिल गिल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून निलंबित करण्यात आले आहे. गिल यांनी उड्डाण प्रशिक्षण संस्थेकडून ३ प्रशिक्षण विमाने लाच म्हणून घेतली होती. गिल यांच्यावर महिन्याभरापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर गिल यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी चालू केली आहे.
अनिल गिल त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आस्थापनांसाठी किरकोळी किमतीत प्रशिक्षण विमाने घेत होते. त्यानंतर ही विमाने इतर उड्डाण प्रशिक्षण संस्थांना भाड्याने देत होते. याबदल्यात अनिल गिल परीक्षणाच्या वेळी उड्डाण प्रशिक्षण संस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्षही करत होते.
संपादकीय भूमिका‘लाचखोरीचे विविध प्रकार’ नावाने भारतात एक पुस्तक छापता येऊ शकते, असेच यावरून वाटते ! अशा लाचखोरांना फाशीची शिक्षा करणारा कायदा करणे आता क्रमप्राप्त झाले आहे ! |