बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आता वरच्या बाजूने खोदकाम करणार !

उत्तरकाशी येथील बोगद्यात १४ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न चालू आहेत. या बचावकार्यात अनेक अडथळे येत असून खोदकाम करणारे ‘ऑगर’ यंत्र आतील लोखंडी संळ्यांमध्ये अडकल्याने नादुरुस्त झाले आहे.

Anti-Drone System : तुये (गोवा) येथे ‘काउंटर-ड्रोन’ कारखाना येणार

काउंटर-ड्रोन म्हणजे ड्रोनविरोधी यंत्रणा : गोव्यातील तरुण या ठिकाणी नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. हे आस्थापन उत्पादनाची निर्यातही करते. २ वर्षांच्या कालावधीत येथे प्रत्यक्ष उत्पादनही चालू होणार आहे.

Save Forts : खर्डा (अहिल्यानगर) येथील ऐतिहासिक गडासमोर प्रसाधनगृह आणि खानावळ यांचे होणारे बांधकाम थांबवले !

गड-दुर्गांचे संवर्धन, रक्षण तर दूरच, उलट त्यासमोर प्रसाधनगृह बांधणे, हा प्रशासनाचा हिंदुद्वेषच ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

Email Threat : १० लाख डॉलर ‘बिटकॉईन’ न दिल्यास मुंबई विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी !

वारंवार अशा धमक्या येणे म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा जराही धाक राहिला नसल्याचेच द्योतक ! हे पोलिसांना लज्जास्पद !

उत्तरप्रदेश येथे अटक केलेल्या आतंकवाद्यांचा ‘दारुल उलूम देवबंद’शी संबंध !

वाढता आतंकवाद आणि आतंकवादी कृत्ये रोखण्यासाठी आतंकवाद्यांना तात्काळ फाशी देणारा कायदा हवा, हे सरकारने आतातरी जाणावे !

Freebies To Muslims : (म्हणे) ‘मुसलमान तरुणांसाठी विशेष ‘आयटी पार्क’ बनवणार !’ – मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

मदरशांमध्ये शिकणारे मुसलमान आयटी पार्कमध्ये कधीतरी रोजगार मिळवू शकतील का ? ‘हिंदूंच्या रोजगारासाठी चंद्रशेखर राव काही करणार आहेत का ?’, अशी विचारणा राज्यातील हिंदू त्यांना का करत नाहीत ?

Law Against Deepfake : ‘डीपफेक व्हिडिओ’च्या विरोधात लवकरच कायदा होणार !

‘डीपफेक व्हिडिओ’, सिंथेटिक व्हिडिओ आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या वापरकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर त्यास सामाजिक माध्यमेच उत्तरदायी असतील.

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

अवैध ठरवलेल्या विधेयकांवर निर्णय घ्या !

राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा वापर कायदा बनवण्याच्या सामान्य मार्गाला खीळ घालण्यासाठी करू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकमधील सरकारी शाळेत ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनात अंडे खाण्यास भाग पाडले !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदुविरोधी घटना सतत घडू लागल्या आहेत. काँग्रेसला निवडून दिल्यास काय होते ?, हे हिंदूंना आतातरी कळेल का ?