जाजपूर (ओडिशा) – येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गातील एका मुलाला शिक्षा म्हणून उठाबशा काढण्यास सांगण्यात आले होते. उठाबशा काढतांना हा मुलगा बेशुद्ध पडला. त्याला प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर कटक येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो वर्गाबाहेर खेळत असल्याने त्याला ही शिक्षा करण्यात आली होती. रुद्र नारायण असे या विद्यार्थ्याचे नाव होते. मुलाच्या वडिलांनी पोलिसांत कोणतीही तक्रार केलेली नाही; मात्र रसूलपूरचे साहाय्यक गटशिक्षणाधिकारी प्रवंजन पाटी यांनी शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी केली आहे.