अभिनेत्री ईशा तलवार यांनी व्यक्त केली खंत !

मुंबई – संस्कृत शिकवणे, वाचणे हे आपण विसरलो आहेत. आम्ही इतके आधुनिक विचारांचे झालो आहोत की, मुलांना फ्रेंच आणि इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही, असे मत अभिनेत्री ईशा तलवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
संस्कृत भाषेमुळे अन्य भाषा समजण्यास साहाय्य होते !
ईशा तलवार यांनी पुढे म्हटले की, मला वाटते की, संस्कृत भाषेचे ज्ञान आपल्याला दुसर्या भाषा समजण्यात पुष्कळ साहाय्य करते. तुम्ही ज्या भाषेमध्ये काम करत आहात, त्या वेळी तुम्हाला अभिनय करतांना त्याच भाषेत विचार करावा लागतो. जर मी हिंदी चित्रपटामध्ये काम करत आहे आणि इंग्रजीमध्ये विचार करत असीन, तर माझ्या अभिनयात माझ्या चेहर्यावर तसेच भाव निर्माण होतील. त्यामुळे ज्या भाषेत काम करत आहात, ती शिकायला हवी.
प्रत्येक कलाकाराला थोड्याफार प्रमाणात संस्कृत आली पाहिजे !
तलवार म्हणाल्या की, मी मुंबईत कॉन्व्हेंट शाळेत शिकले; मात्र मी नंतर स्वतंत्रपणे संस्कृत शिकले. पुण्यातील एका शिक्षिकेने मला संस्कृतमध्ये श्रीमद्भगवतगीता शिकवली. गेल्या १२ वर्षांपासून मी गीतेचे नियमित पठण करत आहे. संस्कृत देवभाषा आहेच, तसे तिला वैज्ञानिक महत्त्वही आहे.

गीता पठणाने चित्त नेहमीच शांत रहाते. मी असा अनुभव घेतला आहे की, प्रत्येक कलाकाराला थोड्याफार प्रमाणात संस्कृत आली पाहिजे. यामुळे तुमचे उच्चार योग्य होतात.
संपादकीय भूमिकाअसे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन