गायींना तमिळ आणि संस्कृत भाषांमध्ये बोलायला शिकवणार ! – स्वामी नित्यानंद

माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील, अशी भाषा आम्ही सिद्ध करत असून त्यामुळे गायीही लवकरच तमिळ आणि संस्कृत भाषांतून बोलू शकतील, असा दावा दक्षिणेतील स्वामी नित्यानंद यांनी केला. याविषयीची चित्रफीत सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे.

कलेमध्ये सत्यासोबत शिव आणि सौंदर्यही असावे ! – सरसंघचालक 

कलेत सत्यता अनिवार्य असली, तरी त्यात शिवाची सात्त्विकता आणि सौंदर्यही असायला हवे. कलेतील सत्य हे जर पहाणार्‍याच्या भावना दुखावणारे किंवा मनाला वेदना देणारे असेल, तर त्याचा काही उपयोग नाही.

राजस्थानच्या विधानसभेमध्ये भूतांचा वावर असल्याने त्याची शुद्धी करण्याची आमदारांची मागणी !

राजस्थानच्या विधानसभेमध्ये भुतांचा वावर आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या स्थापनेच्या पूर्वी येथे यज्ञयाग करून शुद्धी करावी, अशी मागणी आमदारांनी केली.

तेलंगण विधानसभा विसर्जित

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणची विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तेथे मुदतपूर्व निवडणुका होणार आहेत. राव यांनी राज्यपाल इ.एस्.एल्. नरसिंहन् यांची भेट घेतली आणि विधानसभा भंग करत असल्याची माहिती दिली.

राज्यातील ३२ खेळाडूंची शासकीय सेवेत नियुक्ती

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात यश मिळवणार्‍या ३२ खेळाडूंची राज्यशासनाकडून थेट शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर या दिवशी याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला.

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये प्रथमच भारताचे उपराष्ट्रपती उपस्थित रहाणार

शिकागो (अमेरिका) येथे ७ सप्टेंबरपासून चालू होणार्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या परिषदेला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित रहाणार आहेत. भारताची उपराष्ट्रपती स्तराची व्यक्ती प्रथमच त्यात सहभागी होत आहे.

देहलीमध्ये अस्लम खान नावाच्या चोराचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

येथील मुकुंदपूर परिसरात अस्लम खान नावाच्या १६ वर्षांच्या चोराचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबरला घडली. या प्रकरणात पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या लोकांना मानधन मिळणार ! – जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

आणीबाणीच्या काळात १ मासापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक १० सहस्र, तर १ मासापेक्षा अल्प कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक ५ सहस्र रुपयांचे मानधन देण्यात येईल……

(म्हणे) ‘समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही !’ – विधी आयोग

समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही, असे मत विधी आयोगाने व्यक्त केले आहे. याशिवाय मुलगा आणि मुलगी यांचे विवाहाचे वय १८ वर्ष ठेवा, अशी सूचनाही आयोगाने केली आहे.

पूर्व देहली महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने आणि हॉटेल यांना त्यांच्याकडून विकण्यात येणारे मांस ‘हलाल’ आहे कि ‘झटका’, हे सांगावे लागणार !

भाजपशासित पूर्व देहली महानगरपालिकेने त्यांच्या परिक्षेत्रातील दुकाने आणि हॉटेल यांमधून विकले जाणारे मांस हे ‘हलाल’ (हळू हळू गळा चिरणे) आहे कि ‘झटका’ (एका झटक्यात गळा कापणे) प्रकारचे आहे, याची माहिती देणारे फलक लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF