Waqf land row : धारवाड (कर्नाटक) येथे आता मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांच्या भूमींची ‘वक्फ भूमी’ म्हणून नोंद !

धारवाड (कर्नाटक) – हिंदु शेतकर्‍यांच्या भूमीच्या नोंदींमध्ये वक्फ बोर्डाच्या नावाचा विषय विजयपुरानंतर धारवाड जिल्ह्यातही चर्चेत आला. प्रारंभी हे सूत्र हिंदु शेतकर्‍यांपुरते होते. आता ते मुसलमान शेतकर्‍यांच्या भूमीपर्यंतही विस्तारले आहे. आता मुसलमान समाजाचे मार्गदर्शक असणार्‍या धार्मिक नेत्यांच्या भूमीच्या नोंदींमध्येही वक्फ बोर्डाचे नाव नमूद झाले आहे. त्यांना मिळालेल्या इनाम भूमी असल्या, तरी इनाम कायद्यात सुधारणा झाल्यावर त्यांना मालकी हक्क मिळाला होता; मात्र आता शेकडो धार्मिक मुसलमान नेत्यांच्या सहस्रो एकर भूमींच्या नोंदींमध्ये वक्फचे नाव नोंदले गेले आहे. वक्फ बोर्ड या सर्वांच्या भूमी कह्यात घेण्यास पुढे येत असल्यामुळे हे नेते याला विरोध करत आहेत.

संपादकीय भूमिका

आता हे मुसलमान वक्फ कायद्याला विरोध करणार आहेत का ? किंवा हा कायदा रहित करण्याची मागणी ते करणार आहेत का ?