कर्नाटकातील महांतेश्‍वर मठाची भूमीची ‘वक्फ भूमी’ नोंदणी केल्याच्या विरोधात आंदोलन केल्याने नोंदणी रहित !

बेंगळुरू (कर्नाटक) – सेडम तालुक्यातील तोटनळ्ळी गावातील महांतेश्‍वर मठाचे श्री (डॉ.) शिवमूर्ती शिवाचार्य स्वामी यांच्या ५.२४ एकर भूमीच्या नोंदणीत वक्फचे नाव आढळून आले. यामुळे संतप्त भाविकांनी याविरोधात आंदोलन केले. त्यानंतर ही भूमी वक्फच्या नोंदीतून वगळण्यात आली.

१. श्री (डॉ.) शिवमूर्ती स्वामी यांनी थोटनल्ली गावापासून सेडमच्या साहाय्यक आयुक्त कार्यालयापर्यंत, म्हणजे अनुमाने २० कि.मी.ची पदयात्रा काढली. कार्यालयाजवळ पदयात्रा पोचल्यानंतर प्रशासनाकडून नोंदणीतून वक्फचे नाव काढण्यात आल्याची माहिती स्वामजींना देण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच आश्‍चर्य वाटले.

२. यावर स्वामीजी म्हणाले की, त्यांच्या मठाच्या भूमीच्या नोंदवहीतून वक्फचे नाव काढून टाकणे पुरेसे नाही. तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांची नावे नोंदवहीत नोंद झालेली आहेत, तीही नावे काढून टाकली पाहिजे.

३. यावर अधिकार्‍यांनी सांगितले की, नियमानुसार त्यांना ते कायमचे हटवायचे असेल, तर आम्ही वक्फ न्यायालय आयोजित करू आणि वक्फचे नाव काढून टाकू. ही प्रक्रिया २० दिवस किंवा महिनाभरात पूर्ण होईल. या आश्‍वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आल्याचे स्वामीजींनी घोषित केले.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदूंच्या मठ आणि मंदिरे यांच्या भूमी ‘वक्फ भूमी’ केली जात आहे. यास हिंदूंना संघटित होऊन विरोध करणे आवश्यक आहे !