विश्‍वविद्यालये आणि महाविद्यालये यांठिकाणी देशी गायीच्या पालनाचे महत्त्व शिकवण्यावर वेबिनारमध्ये चर्चा !

गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

शेतकर्‍यांना हमीभाव देण्याची व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार नाहीत !

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणांवरून विरोधकांना त्रास होत नाही, तर ‘हे मोदी यांनी का केले ?’ यावरून त्रास होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आज सोहळा

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने परंपरागत ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी कांपाल मैदानात होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

कर्नाटक येथील आयफोन बनवणार्‍या आस्थापनाच्या तोडफोडीच्या मागे साम्यवादी संघटनेचा हात !

आयफोन आणि चिनी भ्रमणभाष आस्थापने यांच्यात स्पर्धा असल्याने चीनला साहाय्य व्हावे म्हणून साम्यवाद्यांनी ही तोडफोड केली नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !

धर्मावरील आघातांविषयी जागृती करणार्‍या ‘सनातन प्रभात’चा हिंदु समाज ऋणी राहील ! – अधिवक्ता विद्यानंद जोग

गेल्या २१ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंच्या समस्या, मंदिर सरकारीकरण, हिंदूंवरील आघात आदी हिंदु समाजापर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रखरपणे आणि अव्याहतपणे केले. हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा ऋणी राहील.

श्रीलंकेपासून शिका, तर चीनपासून सावध रहा ! – भारताची नेपाळला चेतावणी  

नेपाळनेच नाही, तर भारतानेही सावध रहाण्याची आवश्यकता आहे ! तसे न राहिल्यानेच चीनने पेंगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली आहे, ही वस्तूस्थिती आहे !

कर्नाटकातील ६ वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील ब्राह्मणांच्या भावना दुखावणारा धडा भाजप सरकार हटवणार

७ वीच्या पुस्तकातून टिपू सुलतानवरील धडा हटवण्यात आला होता.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आल्याने या कार्यकमाचे संपूर्ण गोमंतकियांसाठी सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजित’ गस्ती जहाजाचे लोकार्पण

या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत.

रिक्शातून उत्तर भारत भ्रमणाची अनोखी साहसी मोहीम

कोल्हापूर हे नेहमी आगळं-वेगळं काहीतरी करण्यासाठी ओळखले जाते.