कर्नाटकातील साहित्यिक के.एस्. भगवान यांचे बौद्धांना उद्देशून हिंदुद्वेषी विधान
मैसुरू (कर्नाटक) – मान मर्यादा असेल, तर मंदिरात जाणे थांबवले पाहिजे. मी मंदिरात जाऊन ५० वर्षे झाली. मंदिरात गेल्याने काहीही होत नाही, असे साहित्यिक प्रा. के.एस्. भगवान यांनी बौद्धांना उद्देशून म्हटले आहे.
प्रा. भगवान पुढे म्हणाले की,
१. हिंदु म्हणजे मागासलेले लोक. हिंदु म्हणजे जे पुढे येत नाहीत आणि इतर कुणालाही पुढे येऊ देणार नाहीत.
२. हिंदु धर्म म्हणजे ब्राह्मणांचा धर्म आहे. केवळ पुरुषांनाच ब्राह्मण म्हणतात. स्त्रियांना ब्राह्मण नाही, तर शूद्र म्हणतात. शूद्र मंदिर बांधतात. मंदिराच्या आत जे असतात, ते ब्राह्मण. मंदिर बांधलेले सगळे शूद्र. शूद्रांना मान मर्यादा असेल, तर त्यांनी मंदिरात जाऊ नये. मनुस्मृतीत शूद्र म्हणजे वेश्येच्या पोटी जन्मलेला, असे म्हटले आहे. (मनुस्मृतीत अशा प्रकारचे कोणतेही विधान नसतांना ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, या वृत्तीचे हिंदुद्वेषी साहित्यिक ! – संपादक) ‘आम्ही शूद्र आहोत’, हे मान्य करायचे का ?
३. आम्हाला हिंदु धर्माची आवश्यकता नाही. सर्वांनी बुद्ध गुरूंवर विश्वास ठेवा. ‘माझ्या विचारांवर विश्वास ठेवा’ असे बुद्धाने सांगितलेले नाही. ‘मी जे बोलतो, ते ऐकलेच पाहिजे, अन्यथा तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही’, असे येशू म्हणतो. पैगंबर म्हणतो, ‘जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही.’ कृष्ण म्हणतो, ‘जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुम्ही नरकात जाल.’ (भगवान कृष्णाने असे कुठेही म्हटलेले नसतांना खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक)
४. जो हीन आहे तो हिंदु आहे. हिंदु म्हणजे हीन असा अर्थ होतो. कुणीही हिंदु असू नये. (जो हीन गुणांचा नाश करतो, तो हिंदु, अशी हिंदूची व्याख्या केलेली असतांना हिंदुद्वेषापोटी खोटा प्रसार करणारे म्हणे साहित्यिक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारत धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात सर्व राजकीय पक्ष हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे पालन करायला सांगतात आणि हिंदू तसे वागतात; मात्र कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी कसे वागतात आणि कसे विचार पसरवतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! |