अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर पोलिसांची धाड

देहली दंगलीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे या आरोपीला खोटी जबानी देण्यास बाध्य केले. तसेच अन्य एका अधिवक्त्याच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जो ३ वर्षांपूर्वीच मृत पावला होता.

उत्तरप्रदेशात एका मासात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या अंतर्गत ३५ जणांना अटक !

एका राज्यात केवळ एका मासात ३५ जणांना अटक होते, याचा अर्थ हे लोण किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, हे लक्षात येते. केंद्र सरकारने लवकरात लवकर देशस्तरावर असा कायदा करून हिंदु तरुणींना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !

प्रसिद्धीपत्रकांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू !

यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?

श्री दत्तजयंती निमित्त २९ आणि ३० डिसेंबरला देवगडकडे (जिल्हा नगर) जाणारे रस्ते बंद रहाणार !

दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या आणि फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

गेंडुरझरिया (जिल्हा गोंदिया) परिसरात नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला !

नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत. त्या दृष्टीने शासनाने ठोस कृती करायला हवी !

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ! – विश्वास नांगरे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल.

३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडवा हाच खरा हिंदूंचा नववर्षारंभ ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर 

हिंदु कालगणनेकडे दुर्लक्ष करून आपण आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतो. असे करणे म्हणजे अजुनही आपण इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीत जगत आहोत.

पर्यटकांच्या दायित्त्वशून्य वागण्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंग्लंड येथून आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक करा ! – रोहन खंवटे, आमदार

काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

भगवद्गीतेतील मार्गदर्शन आजही उपयुक्त ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

तणावपूर्ण जीवनशैलीमधून बाहेर येण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेले मार्गदर्शन आजही तेवढेच उपयुक्त आहे. सध्याची समाजव्यवस्था  व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करणारी आहे.