
कोल्हापूर, २७ डिसेंबर – स्वातंत्र्याची ७३ वर्षे होऊनही आपण सर्व हिंदू इंग्रजी कालगणनेनुसार सर्व व्यवहार करत आहोत. हिंदु कालगणना कित्येक वर्षांपासून आणि युगांपासून चालू आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतो. असे करणे म्हणजे अजुनही आपण इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीत जगत आहोत. त्यामुळे ३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडवा हाच खरा हिंदूंचा नववर्षारंभ, हे हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी व्यक्त केले.

३१ डिसेंबर संदर्भातील प्रबोधन आणि ‘हिंदु कालगणनेचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमासाठी ५४ धर्मप्रेमींची उपस्थिती होती. श्री. दुसे यांनी ३१ डिसेंबरच्या नावाखाली चालू असलेले अपप्रकार रोखण्यासाठीचे आवाहन सर्वांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोहित पाटील यांनी केले.
✖ हैप्पी न्यू ईयर दोस्त.. 🤝
✔ हमारा नववर्ष तो चैत्र शु. प्रतिपदा को है ! 🙏हिन्दुओे, अपनी संस्कृति पर गर्व करें !
नववर्ष – चैत्र शुक्ल प्रतिपदा को ही मनाएं ! pic.twitter.com/8QQ5aMNGd4
— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) December 29, 2018
क्षणचित्रे१. सर्वांनी ‘३१ डिसेंबर साजरा करणार नाही’, हे सांगण्यासाठी ‘जय श्रीराम’, असा संदेश पाठवून प्रतिसाद दिला. २. कु. आसावरी एरंडे यांनी ‘खूप छान माहिती मिळाली. इतरांनाही सांगेन’, अशा प्रकारचा संदेश पाठवला. |
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार