अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंकडून अजानच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार !

याविषयी सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे पोलीस निदान कुलगुरूंच्या तक्रारीकडे तरी लक्ष देतील, अशी अपेक्षा ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना जनतेला अजानमुळे त्रास होऊ नये, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावई यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘कुंभमेळा पेज’चे श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण !

सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे.

सोमनाथ मंदिराला पाडणार्‍या गझनीचे कौतुक करणार्‍या मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद

सोमनाथ मंदिराला लुटणार्‍या महंमद गझनी याचे कौतुक करणार्‍या मौलानाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध चालू केला आहे

अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांचे अटकेपासूनचे संरक्षण न्यायालयाकडून कायम

रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे.

कुंभमेळ्यासाठी बनवलेली १ सहस्र शौचालये आगीत जळून खाक; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

१० मार्चला यातील एका शौचालयाला अचानक आग लागली आणि सर्व शौचालये जळली.

सैन्यभरती घोटाळ्याच्या प्रकरणी ५ सैन्याधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे अशा घोटाळेबाजांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

गेल्या २ वर्षांत २ सहस्र रुपयांची एकही नोट छापलेली नाही ! – केंद्र सरकार

बाजारातून २ सहस्र रुपयांच्या नोटा अल्प होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटा न छापण्याचा निर्णय घेतला.

केंद्र सरकारने मे २०२० पासून प्रति लिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल मिळवला !

इंधन दरवाढीमुळे जनतेमध्ये संताप असतांना सरकार अशा प्रकारचे महसूल गोळा करत असेल, तर हा जनतेवर केलेला अन्याय नव्हे का ?  

आयुर्वेद वैद्यांना शस्त्रकर्म करण्याच्या अनुमतीवर सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस  

पदव्युत्तर आयुर्वेद वैद्यांना ३९ सामान्य शस्त्रकर्म, तसेच डोळे, कान, नाक आणि गळा यांच्या संदर्भातील १९ शस्त्रकर्म करण्यास मान्यता देण्यात आली आहे.