शरजील उस्मानी याच्या विरोधात धार्मिक भावना दुखाल्यावरून गुन्हा नोंद

नुसता गुन्हा नोंद करून उपयोग नाही, तर त्याला अटक करून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत ! पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या विरोधात असणारा कायदा भारतातही असला पाहिजे !

नवी देहली – अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या विरोधात ट्वीटद्वारे धार्मिक भावना भडकावल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘जो हिंदू श्रीरामाचा जयघोष करतो, तो आतंकवादी असतो’, असे त्याने ट्वीट केले होते.  भाजपचे नेते नवीन कुमार यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.