झारखंड, बंगाल, मेघालय आणि आसाम या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग
धनबाद (झारखंड) – कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदु धर्म आणि अध्यात्म यांच्या प्रसारासाठी कसा प्रयत्न करू शकतो, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका ‘ऑनलाईन’ सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, मेघालय अन् आसाम या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी संबोधित केले.
कार्यशाळेचा उद्देश सांगतांना श्री. गवारे म्हणालेे, ‘‘सध्याच्या काळात ‘ट्विटर’च्या माध्यमातून धर्मप्रसार करतांनाच धर्मविरोधी शक्तींचा विरोधही करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यशाळेतून शिकल्यानंतरर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करूया.’’ या वेळी श्री. गवारे यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपण धर्मप्रसार कसा करू शकतो, याविषयी माहिती सांगितली. समितीच्या कु. कनक भारद्वाज आणि सुमंत देबनाथ यांनी ‘ट्विटर’चा वापर कसा करावा, याविषयी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना माहिती दिली. या कार्यशाळेचा लाभ अनेक हिंदुत्वनिष्ठांनी घेतला.