चुरू (राजस्थान) येथील गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

गायींचा मृत्यू चार्‍यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवणार्‍या राजकीय नेत्यांची सूची सार्वजनिक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

२७ वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या अहवालावर अद्यापपर्यंत कारवाई होत नाही, हा भारतीय लोकशाहीवर लागलेला कलंकच आहे, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ? भारतीय राजकारणाची ही शोकांतिका नव्हे तर आणखी काय ?

केरळ राज्यात आता सामाजिक माध्यमांवर ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्यास ५ वर्षे कारावासाची शिक्षा

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केरळ पोलीस कायद्यात कलम ११८ (अ) समाविष्ट करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.

देहली दंगलीच्या प्रकरणी पी.एफ्.आय. आणि भीम आर्मी यांच्या संबंधाची ‘ईडी’कडून चौकशी

केंद्र सरकारने अद्याप जिहादी संघटना पी.एफ्.आय.वर बंदी का घातली नाही, असा प्रश्‍न धर्माभिमानी हिंदूंच्या मनात पडत आहे !

चीनमधून आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आता नोंदणी अनिवार्य ! – केंद्र सरकारचा आदेश

चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा निकृष्ट असतो, असे नेहमीच समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनमधून आयात होणार्‍या ७ उत्पादनांसाठी नोंदणी अनिवार्य करण्याचा आदेश काढला आहे.

फेसबूकवरील लिखाणावर लक्ष ठेवण्याच्या मंडळातील नोबेल पारितोषिक विजेती महिला ‘मुस्लिम ब्रदरहुड’ या आतकंवादी संघटनेशी संबंधित

जिहादी आतंकवादी संघटनांच्या सदस्य असणारी लोक फेसबूकमध्ये असतील, तर ते हिंदू नेते, संघटना यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक पानांवर बंदी घालणारच, हे लक्षात घ्या !

सरकार अशा वेब सिरीजवर कारवाई कधी करणार ?

‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमध्ये एका मंदिराच्या परिसरामध्ये मुसलमान तरुण हिंदु तरुणीचे चुंबन घेतांनाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

‘ए सुटेबल बॉय’ वेब सीरिज में मंदिर के प्रांगण में मुसलमान युवक हिन्दू युवती का चुंबन लेता है ! 

सरकार ऐसे वेब सीरिज पर कार्रवाई कब करेगी ?

(म्हणे) ‘धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद कोरोनापेक्षाही गंभीर !’  

हिंदु कट्टरतावादी असते, तर हा देश केव्हाच ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झाला असता, इस्लामी देशाप्रमाणे अल्पसंख्यांकांना हद्दपार केले असते, ते तसे नसल्यामुळे श्रीराममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी आणि ज्ञानवापी मशीद यांसाठी वैध मार्गाने लढा देत आहेत !

हसनपूर (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरातील श्री महाकालीदेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हे मंदिर वर्ष १११३ मध्ये बांधण्यात आले आहे. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी उघड झाली, जेव्हा भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !