देहली दंगलीच्या प्रकरणी पी.एफ्.आय. आणि भीम आर्मी यांच्या संबंधाची ‘ईडी’कडून चौकशी

केंद्र सरकारने अद्याप जिहादी संघटना पी.एफ्.आय.वर बंदी का घातली नाही, असा प्रश्‍न धर्माभिमानी हिंदूंच्या मनात पडत आहे !

नवी देहली – देहलीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या दंगलीमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि भीम आर्मी यांच्यात संबंध होते, असे समोर आले आहे.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उपाख्य रावण याचे पी.एफ्.आय.शी संबंध असल्याची माहिती मिळाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने या संदर्भात चौकशी चालू केली आहे. त्याला काही पुरावे मिळाले आहेत. या पुराव्यांमुळे उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर झालेल्या कथित बलात्काराच्या आणि नंतर झालेल्या हत्येच्या प्रकरणातून या दोन्ही संघटनांचा हिंसाचार करण्याचा कट उघड झाला आहे, असा दावा करण्यात आला आहे. यावर भीम आर्मीने ‘आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सिद्ध आहेत’, असे म्हटले आहे, तर पी.एफ्.आय.ने ‘आमची संघटना कोणत्याही कायदाविरोधी कृत्यामध्ये सहभागी नाही’, असे म्हटले आहे.