चुरू (राजस्थान) येथील गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

चुरू (राजस्थान) – येथील सरदारशहर तालुक्यातील बिल्युबास रामपुरा येथील श्रीराम गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 (सौजन्य : ABP NEWS HINDI)

येथील तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी सांगितले की,  या गायींचा मृत्यू चार्‍यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.