शेतकर्‍यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देण्यास सांगितले !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !

भारतीय शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ, तसेच त्यांच्यावर झालेली भयावह अन् चिंताजनक आक्रमणे !

वर्ष २००९ ते २०१३ या ४ वर्षांच्या काळात ११ भारतीय अणू शास्त्रज्ञांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रकरणी वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी शास्त्रज्ञांच्या जिवांची काळजी घ्या, अशी केंद्र सरकारला तंबी दिली.

भ्रमणभाष खरेदीसाठी १० सहस्र रुपये न दिल्याने धर्मांध मुलाकडून सावत्र आईची गळा दाबून हत्या !

धर्मांधांची हिंसाचारी मनोवृत्ती ! मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भ्रमणभाष खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने स्वतःच्या सावत्र आईची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर याची वडिलांना माहिती दिली आणि तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !  

#KashmiriHindusExodus_31Yrs हा हॅशटॅग ट्रेंड चौथ्या क्रमांकावर !

१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर  #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.

जोडवाडी (जिल्हा संभाजीनगर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या

निवडणुकीत हाणामारी, हत्या, पैसे वाटप, बनावट मतदान असे अनेक गुन्हे घडत असल्याने सध्याची लोकशाही निरर्थक ठरत आहे.

८९ जणांना जामीन संमत; ठाणे न्यायालयाचा निर्णय

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल या दिवशी जमावाने केलेल्या आक्रमणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणी १६ जानेवारीला ठाणे न्यायालयाने ८९ जणांना जामीन संमत केला आहे.

‘आश्रम’ वेब सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे धर्मांधाकडून एका तरुणीची हत्या

आश्रम वेब सिरीजमधून हिंदूंच्या संतांचा, आश्रमव्यवस्थेचा अवमान करण्यात आला होता आणि आता त्याचा समाजावर काय परिणाम झाला हेही दिसून आले आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे धर्मांधाकडून भीम आर्मीच्या नेत्याची हत्या

गावकर्‍यांनी जाळले धर्मांधाचे घर !
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने !
‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?