दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण

धर्मांधांकडून जे काही हिंदुद्वेषी इस्लामी धोरण राबवले जात आहे, त्याला काँग्रेसनेच गेले १०० वर्षे खतपाणी घातले आहे. त्यामुळे आज पाक आणि बांगलादेश, तसेच भारतातील काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशसंहार झाला अन् होत आहे. त्यामुळे काँग्रेसने आता प्रायश्‍चित्त म्हणून धर्मांधांचा प्राणपणाने विरोध करून हिंदूंचे रक्षण करावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृती करावी, तरच काँग्रेसला हिंदूंविषयी खरेच काही वाटते हे लक्षात येईल ! – संपादक

काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

नवी देहली – काश्मीरमध्ये मुसलमानेतरांच्या हत्या, बांगलादेशात हिंदूंच्या हत्या आणि ९ सैनिकांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का ? कदाचित् आहे. दक्षिण आशिया इस्लामच्या अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे, असे ट्वीट काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीर, तसेच बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, भारतीय सैनिकांचे हौतात्म्य यांवर त्यांनी त्यांचे मत मांडले आहे.