उत्तर दिनाजपूर (बंगाल) येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची हत्या

भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप

बंगालमध्ये आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू न केल्याचाच हा परिणाम आहे ! – संपादक

भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष

उत्तर दिनाजपूर (बंगाल) – येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमागे तृणमूल काँग्रेस आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. ‘राजकीय उलथापालथ झाल्यावर मिथुन घोष यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी अधिकारी यांनी दिली. राज्यात अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.