वीजदेयक भरले नसल्याचा संदेश पाठवून अधिकोषातील पैसे लांबवणारी टोळी महाराष्ट्रात कार्यरत !

नवीन ‘अ‍ॅप इन्स्टॉल’ करून वीज शुल्क न भरता बँकेने पुरवलेल्या ‘अ‍ॅप’द्वारे वीज शुल्क भरल्यास फसवणूक होणार नाही.

‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावरील बहिष्कार मी गांभीर्याने घेत नाही !

१ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होणार्‍या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाविषयी सामाजिक संकेतस्थळावर ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ (लाल सिंह चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार घाला) ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यावर करीना यांनी असे विधान केले.

संजय राऊत यांच्यानंतर अनिल परब कारागृहामध्ये जाणार ! – किरीट सोमय्या, भाजप नेते

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर लवकरच परिवहनमंत्री अनिल परब यांनाही अटक होऊ शकते, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट पहाण्यास प्रेक्षकांचा स्पष्ट नकार !

‘हिंदू जागृत होत असून देवतांची विटंबना करणार्‍या आणि भारताविषयी अनुद्गार काढणार्‍या अभिनेत्याला जागा दाखवून देण्यास सिद्ध आहेत’, हेच यावरून स्पष्ट होत आहे !

भाजपकडून स्थानिक पक्ष संपवण्याचे घृणास्पद कारस्थान चालू आहे ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्याविषयी मला अभिमान आहे. ते माझे मित्र असून निर्भीड शिवसैनिक आहेत. त्यांचा गुन्हा काय आहे ?

‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ४८ इमारतींचा अनधिकृत भाग पाडण्याचा न्यायालयाचा आदेश !

महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम होऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

(म्हणे) ‘गुजराती आणि राजस्थानी यांना काढल्यास मुंबई ‘आर्थिक राजधानी’ रहाणार नाही !’

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते; मात्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला ‘आर्थिक राजधानी’ म्हटले जाणार नाही’, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीस मुख्य न्यायमूर्तींचा नकार !

याचिकाकर्ते मुंबईचे निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी त्यांच्याविरोधात सरन्यायाधिशांकडे तक्रार केल्याने ते हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे निर्देश दीपांकर दत्ता यांनी या प्रकरणात दिले आहेत.

केतकी चितळे यांच्यावरील गुन्हे मागे घ्या ! – अजयसिंह सेंगर, करणी सेना प्रमुख, महाराष्ट्र

करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी ‘मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर लावलेला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा रहित करावा’, अशी मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.