‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावरील बहिष्कार मी गांभीर्याने घेत नाही !

लाल सिंह चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेविषयी अभिनेत्री करीना कपूर-खान यांचे विधान

मुंबई – ‘आजकाल प्रत्येकाला आपले मत मांडायचे असते. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे, अन्यथा तुमचे जीवन जगणे कठीण होईल; म्हणूनच मी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावरील बहिष्कार गांभीर्याने घेत नाही. मला ठाऊक आहे की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रत्येकाचे त्याविषयी काही ना काही मत असेल. मला या चित्रपटावरील बहिष्काराच्या वादावर स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटत नाही’, असे विधान अभिनेत्री करीना कपूर-खान यांनी केले.

(सौजन्य : FilmiBeat) 

१ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होणार्‍या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाविषयी सामाजिक संकेतस्थळावर ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ (लाल सिंह चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार घाला) ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यावर करीना यांनी वरील विधान केले.