मुंबई – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) संचालक सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी नकार दिला आहे. याचिकाकर्ते मुंबईचे निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी त्यांच्याविरोधात सरन्यायाधिशांकडे तक्रार केल्याने ते हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना दुसर्या खंडपिठाकडे दाद मागण्याचे निर्देश दीपांकर दत्ता यांनी या प्रकरणात दिले आहेत.
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रकरण ऐकले आणि याचिकाकर्त्याच्या विरोधात निकाल गेला, तर प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असेही न्यायालयाने शेवटी नमूद केले.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या संचालकपदी झालेली नियुक्ती योग्य आणि कायदेशीरच असल्याचा दावा केंद्र सरकारने २७ जुलै या दिवशी प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.