हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

मुंबई – पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला. तेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकांत अकबर, टिपू सुलतान आदी मुसलमान आक्रमकांचे धडे शिकवले जाऊ लागले की, जे आजपर्यंत चालूच आहे. एकूणच ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणक्षेत्राचे इस्लामीकरण चालू आहे. हा ‘शिक्षण जिहाद’च आहे.

जोपर्यंत भारत घटनात्मक दृष्टीने हिंदु राष्ट्र बनत नाही, तोपर्यंत देशाच्या शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत इस्लामीकरण चालूच राहिल, असे स्पष्ट प्रतिपादन झारखंड येथील ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जाते ! – रितेश कश्यप, पत्रकार, ‘पांचजन्य’, झारखंड
झारखंड राज्यात राजधानी रांचीसह, दुमका, जामताडा, गढवा, पलामू, पाकूर, बोकारो आदी जिल्ह्यांत ‘सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी देणे’, ‘हिंदीऐवजी उर्दूला प्राधान्य देणे’, या गोष्टी सामाजिक माध्यमे तथा प्रसारमाध्यमांतून उजेडात आल्या. सरकारी आदेशाविना केवळ संख्याबळाच्या आधारे कट्टर मुसलमानांकडून शेकडो शाळांमध्ये गेली १० ते २५ वर्ष हे घडवून आणले जात आहे. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व चालू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.
हे पहा –
हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की…
🟢 भारत में शिक्षा जिहाद ?
______________________

मुलांच्या अभ्यासक्रमांत काय शिकवले जाते, याविषयी पालकांनी जागरूक रहावे ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर बहुतेक शिक्षणमंत्री हे मुसलमान किंवा मुसलमानधार्जिणे होते. त्यामुळे शिक्षणात चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) पुस्तकांमध्ये आक्रमक मोगलांचे उदात्तीकरण करण्यासाठी पानेच्या पाने खर्ची करण्यात आली आहेत. एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात ‘दी लिटल बुली’ या धड्यात ‘हरि’ नावाचा विद्यार्थी मुलींची छेड काढणारा, तर ‘अब्दुल’ नावाचा विद्यार्थी चांगले काम करणारा दाखवला आहे. यातून साम्यवादी विचारांच्या लोकांनी पद्धतशीरपणे हिंदु धर्माविषयी द्वेष पसवण्याचे काम केले आहे. ‘बालभारती’च्या पुस्तकातही ‘अफझलखानवधा’चे चित्र नाही; पण ‘ईदगाह’ हा धडा शिकवला जात आहे. गोव्याच्या एका पाठ्यपुस्तकात ‘बार्देश प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ३ दिवस आक्रमण करून जनतेवर अत्याचार केला’, असा खोटा इतिहास शिकवला जात होता. त्यामुळेच पालकांनी जागृत होऊन मुलांच्या अभ्यासक्रमांत नेमके काय शिकवले जाते, हेसुद्धा तपासले पाहिजे.
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !