मुंबई – करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी ‘मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर लावलेला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा रहित करावा’, अशी मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
केतकी चितळे यांनी जातीवाचक उल्लेख केला नसल्याने या कायद्याचा अपवापर होत आहे. हा कायदा राज्यघटनाविरोधी असून त्यामुळे राज्यघटनेचा अवमान होत आहे. जातीवाद वाढवणारा, सामाजिक विषमता निर्माण करणारा कायदा सरकारने रहित करावा. केतकी चितळे यांच्यावर तक्रार प्रविष्ट करणार्याने ‘मी बुद्ध जातीचा आहे’, असे म्हटले आहे. बुद्ध ही जात नसून तो पंथ आहे. त्यामुळे येथे हा कायदा लागू होत नाही. महाआघाडी सरकारच्या दबावाखाली हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, त्यामुळे खोटे गुन्हे नोंद करणार्या अधिकार्यांनाही निलंबित करावे, असे सेंगर यांनी निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याप्रकरणी केतकी यांच्यावर गुन्हे नोंद आहेत.