‘झी ५’ ओटीटी  मंचावर प्रदर्शित होणार ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ नावाची वेब सीरिज !

झी ५’ या ‘ओटीटी’ मंचावर ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ (उघड न झालेले) नावाची वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

पंढरपूर येथील कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या तुळशी वृंदावनातील संतांच्या मंदिरांचे चौथरे निकृष्ट दर्जाचे !

तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात फळपीक विम्याची साडेचौदा सहस्र बोगस प्रकरणे !

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत.

शासकीय, तसेच खासगी रक्तपेढ्यांतील रक्ताच्या दरात वाढ !

शासकीय रक्तपेढ्यांतून विकत मिळणार्‍या प्रतियुनिट रक्ताकरता पूर्वी ८५० रुपये द्यावे लागायचे. ते यापुढे १ सहस्र १०० रुपये देऊन विकत घ्यावे लागणार आहे.

नवी मुंबईत आर्.टी.ई.च्या प्रतीक्षा सूचीतील ११७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकर प्रवेश घ्यावा ! – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी

बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये प्रतीवर्षीप्रमाणे खासगी विनाअनुदानित शाळेत एकूण पटाच्या २५ टक्के विद्यार्थांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. त्यामध्ये अर्जांवरून पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केले आहेत.  

मुंबई येथे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे ‘लेप्टो’ आजार होण्याची भीती !

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यातूनच मुंबईकरांना ‘लेप्टो’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागाकडून २७ शिक्षकांना नियुक्तीसाठी अंतिम संधी !

महापालिका शाळेत तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरतीमध्ये निवड होऊनही जे शिक्षक अद्याप नियुक्ती पत्र घेण्यासाठी आले नाहीत, अशा २७ शिक्षकांना शेवटची संधी म्हणून एक नोटीस पाठवण्यात येणार आहे,

राज्‍यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरित करणार !

इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्‍य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्‍न सभागृहात उपस्‍थित केला.

राजकीय भांडवलासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालू नये ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

‘देहली येथे निर्भया हत्‍या प्रकरण घडले, त्‍या वेळी कुणाचे राज्‍य होते ?, हे आपण पाहिले नव्‍हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्‍हा मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्‍हा आपण ‘शक्‍ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.