‘झी ५’ ओटीटी  मंचावर प्रदर्शित होणार ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ नावाची वेब सीरिज !

( ओटीटी म्हणजे ‘ओव्हर दी टॉप.’ अ‍ॅपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आधी कार्यक्रम पहाणे)

मुंबई – ‘झी ५’ या ‘ओटीटी’ मंचावर ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ (उघड न झालेले) नावाची वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज एका लघुपटासारखी असणार असून यात तज्ञ आणि पीडित हिंदू यांच्याशी कश्मीरमधील जिहादी आतंकवादी अन् धर्मांध मुसलमान यांच्याकडून झालेल्या अत्याचारांच्या संदर्भात करण्यात आलेल्या वार्तालापाचा समावेश आहे. याचे विज्ञापन (ट्रेलर) प्रकाशित करण्यात आला आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन विवेक अग्नीहोत्री यांनी केले आहे. त्यांनीच ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात ज्या गोष्टी दाखवणे शक्य झाले नाही, त्या गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहेत.