‘गाझा’साठी गूगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्यांच्या निलंबनाचे प्रकरण
मुंबई : नुकताच ‘इस्रायलसमवेतचा करार गूगलने रहित करावा’ यासाठी गूगलच्या २८ कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन करून थेट गूगलवरच दबाव आणला. या पक्षपाती कर्मचार्यांवर कडक कारवाई करत गूगल आस्थापनाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथितयश आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी कामापेक्षा धर्माला अधिक महत्त्व देत असतील आणि साम्यवादी धोरण राबवत असतील, तर अशा कर्मचार्यांकडून न्यायाची अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सनातन संस्थेचे धार्मिक पूजा, आरती, नामजप, तसेच जनप्रबोधन करणारे असे ५ अॅप ‘गूगल प्ले-स्टोर’वरून हटवण्यात आले होते. यामागेही ‘गाझाप्रेमी’ साम्यवादी मानसिकता कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सनातनचे समाज आणि राष्ट्र हितकारी अॅप हटवणार्या गूगलच्या कर्मचार्यांवरही ग कठोर कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.
Press Release!
The suspension of 28 employees, who were allegedly protesting in #Google's office for #Gaza, has sparked controversy.
The Sanatan Sanstha has demanded action against those it claims are responsible for shutting down its religious ritual app, linking it to a… pic.twitter.com/qFCQZxbspx
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) April 20, 2024
सनातन संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
गूगलचे कर्मचारी तथाकथित मानवतावादी !
वरकरणी गाझामधील हिंसाचार रोखला जावा अथवा इस्रायलसमवेतच्या करारामुळे गाझामध्ये हिंसाचाराला हातभार लागू नये; म्हणून सदर कर्मचारी आंदोलन करत असल्याचे दिसत असले, तरी हीच संवेदनशीलता पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपते ? इतकेच नव्हे, तर जगभरात गाझाच्या व्यतिरिक्त सुदान, बलुचिस्तान, अफगाणिस्तान यांसह अनेक ठिकाणी हिंसाचार चालू आहेत. अनेक ठिकाणी मानवता नष्ट केली जात आहे. त्याविषयी गूगलच्या तथाकथित मानवतावादी कर्मचार्यांना आंदोलन का करावे वाटले नाही ? एकूणच इस्रायलच्या निमित्ताने पक्षपाती आणि एकांगी भूमिका घेणारे कर्मचारी समोर आले आहेत.
सनातन संस्थेचे प्रसिद्धी पत्रक –
Case of suspension of 28 'Gaza-Loving' employees who were protesting at @Google
'The Sanatan app related to Dharmik rituals was shut down because of this very same '#Gaza-Loving' #communist attitude; Google should take action against the guilty!'
– @1chetanrajhans National… pic.twitter.com/9ebFJGKF33
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2024
सनातन संस्थेचे अॅप पुन्हा गूगल प्ले स्टोअरवर आणा !
मध्यंतरी ‘सनातन संस्थे’चे नामजप आणि देवतांच्या आरतीविषयी असलेले ‘सनातन चैतन्यवाणी’, ‘गणेश पूजा आणि आरती’, ‘श्राद्धविधी’, ‘सर्व्हायवल गाईड’ (आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन) आणि ‘सनातन संस्था’ असे ५ अॅप हे गूगल प्ले-स्टोअरवरून कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले आहेत. दंडेलशाहीने वागणार्या गूगलमधील ‘गाझाप्रेमी’ मानसिकतेच्या साम्यवादी कर्मचार्यांनी मध्यंतरी ‘भारत मॅट्रीमोनी’, ‘शादी डॉट कॉम’, ‘नौकरी डॉट कॉम’, ‘९९ एकर्स डॉट कॉम’ आदी अॅप हटवले होते; परंतु मोठ्या विरोधानंतर पुन्हा ते अॅप प्ले-स्टोअरवर ठेवण्यात आले. सनातन संस्थेचे लक्षावधी लोकांच्या पसंतीस उतरलेले समाज आणि राष्ट्र हितकारी अॅप गूगल प्ले-स्टोअरवर पुन्हा ठेवण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे.