गुणवत्तेवर आधारित प्रवेश होण्यासाठी मागणी !
पुणे – अकरावीसाठी राबवण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ प्रवेशामध्ये व्यवस्थापन, अल्पसंख्यांक, ‘इनहाऊस’ अशा विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शून्य ते शेवटच्या फेरीपर्यंत संधी दिली जाते; परंतु कोट्यांतर्गत प्रवेशामध्ये अर्ध्याहून अधिक जागा रिकाम्या रहात आहेत; म्हणूनच आता विद्यार्थ्यांचे प्रवेश हे गुणवत्तेवर आधारितच व्हावे आणि विविध प्रकारच्या कोट्यांतर्गत प्रवेश नियमित प्रवेश फेर्यांपूर्वीच राबवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
व्यवस्था सुधारणा मोहीम (सिस्कॉम) यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत राबवलेल्या ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विविध कोट्यांतर्गत प्रवेशाचा तपशिल माहिती अधिकारामध्ये मागवण्यात आला होता. त्यात विविध कोट्यांतर्गत १०० टक्के जागा भरल्या जात नाहीत, असे लक्षात आले आहे.
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून असा निर्णय का घेत नाही ? |