गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर बंदी घाला !

गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर देशव्यापी बंदी घालावी. ज्यायोगे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारित होणार नाही असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आले आहे.

(म्हणे) ‘अ‍ॅलोपॅथीवर टीका करणार्‍या रामदेवबाबांवर गुन्हा नोंदवा !’  

कोरोना महासाथीच्या पार्श्‍वभूमीवर भारतात ठिकठिकाणी बर्‍याच डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाझार करणे किंवा डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्ण दगावणे यांसारखी अनेक प्रकरणे बाहरे आली. अशा कर्तव्यशून्य आणि भ्रष्ट डॉक्टरांवर कारवाई करण्याविषयी आय.एम्.ए. मूग गिळून गप्प बसते.

२७ मेपासून सांगली जिल्ह्यातील छोट्या मोठ्या सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडण्यास अनुमती द्या ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

महापूर आणि यानंतर सलग २ वर्ष कोरोनाच्या आपत्तीचा तडाखा यांमुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी कुटुंबासाठी १० सहस्र रुपये अनुदान द्या !

मंदिर बंद असल्याने अडचणीत असलेल्या पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

पोलीस कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सांगली पोलीस अधीक्षकांना निवेदन 

समाज विध्वंसक कृत्यात सहभागी असलेल्या, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

खतांच्या दरवाढीच्या विरोधात सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

कोरोनाचा संसर्ग वाढलेला असूनही आंदोलनांमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या कार्यकर्त्यांवर प्रशासन कारवाई करणार का ?

माळशिरस तालुक्यातील ‘कोविड केअर सेंटर’मध्ये रुग्णांना तात्काळ औषधे उपलब्ध करून द्या !

‘कोविड केअर सेंटर’मध्ये उपचार घेत असणार्‍या २५० रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांची अचानक पहाणी करा ! – मयुर घोडके, शहरप्रमुख, शिवसेना

रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

मळेवाड, रेडी आणि कासार्डे या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका देण्याची मागणी

मळेवाड, रेडी आणि कासार्डे या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत आहेत.

लसीकरणाच्या संदर्भातील गोंधळ थांबवा !

संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शुक्रवार पेठ शिवसेना (कोल्हापूर) यांच्या वतीने निवेदन