नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे जिल्हाधिकार्यांकडे निवेदन

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील पुजार्यांसाठी लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यासह मंदिर बंद असल्याने अडचणीत असलेल्या पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची मागणी नगराध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त सचिन रोचकरी यांनी निवेदनाद्वारे २१ मे या दिवशी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पुजारी बांधवांना लसीकरणासाठी २० सहस्र डोस उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुजार्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसून ते आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे पुजारी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन