डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – शिवसेना महिला आघाडीची मागणी

डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्याकडे मेंदूतज्ञ होण्याकरिता आवश्यक डिग्री उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले; पण त्यांना पदवी प्राप्त झालेली नाही. त्यांनी प्राईम हॉस्पिटल या त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये प्रविष्ट होणार्‍या रुग्णांना मेंदूतज्ञ (न्युरोसर्जन) असल्याची बतावणी करून शेकडो चुकीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

खाजगी चिकित्सालये आणि नर्सिंग होम यांचा ‘दुकान आणि आस्थापना कायदा १९४८’ मध्ये समावेश करण्यास ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध

खाजगी चिकित्सालये, नर्सिंग होम यांचा ‘दुकान आणि आस्थापना कायदा, १९४८’ मध्ये समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयास ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने विरोध केला असून यासंदर्भात न्यायालयीन साहाय्य घेतले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मागील १० मासांपासून रुग्णालयात औषधांचा पुरवठा झालेला नाही. या प्रकरणावरून स्थायी समितीने प्रशासनाला धारेवर धरले असता औषधांचा पुरवठा करण्यास दिरंगाई झाल्याचे प्रशासनाने मान्य केले.

पुणे येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्याने नवजात बाळाचा मृत्यू

पुणे शहरातील बुधवार पेठेतील ‘वात्सल्य मॅटर्निटी होम’मधील इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या नवजात बालकाचा इन्क्युबेटरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक भाजल्याने मृत्यू झाला.

जगभरात प्रतिदिन १०० पैकी २५ मृत्यूंना हृदयरोगच कारणीभूत !

वयाच्या पन्नाशीत त्रास देणारा हृदयविकार सध्याच्या काळात तिशी किंवा चाळीशीतच होत असल्याचे उघड झाले होते. जगभरात दगावणार्‍या प्रत्येक १०० व्यक्तींपैकी किमान २५ मृत्यू केवळ हृदयरोगाने होतात.

बंधपत्रित सेवा (बॉण्ड) पूर्ण न केलेल्या २ सहस्र बोगस आधुनिक वैद्यांवर कारवाई होणार  

राज्यातील सार्वजनिक, तसेच पालिका वैद्यकीय महाविद्यालयांतून पदवी, तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या २ सहस्र आधुनिक वैद्यांनी अजूनपर्यंत ग्रामीण भागात जाऊन सेवा दिलेली नाही.

रक्तपेढ्यांतील दूषित रक्तामुळे ३ वर्षांत ७८ जणांना एड्सची लागण

रक्तपेढ्यांतील दूषित रक्त आणि रक्तघटक यांच्या संक्रमणामुळे वर्ष २०१४ ते २०१७ या ३ वर्षांत ७८ जणांना एच.आय्.व्ही.ची बाधा झाली आहे. यांपैकी वर्ष २०१६-१७ या चालू वर्षांत १८ जणांना रक्त संक्रमणातून एच.आय्.व्ही.ची लागण झाली,

एका नामांकित रुग्णालयाकडून आधुनिक वैद्यांना लाच दिली जाणे

जुलै २०१७ मध्ये एका नामांकित रुग्णालयाचा एक प्रतिनिधी मला भेटायला माझ्या चिकित्सालयात आला. त्याने मला एक बंद लखोटा दिला. मी त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, तुम्ही आमच्या रुग्णालयात दिलेल्या सेवेचे पैसे आहेत. त्यावर मी त्याला सांगितले, मी तुमच्या रुग्णालयात सेवा दिली नाही.

सोलापूर जिल्ह्यात ९ महिलांच्या अवैध गर्भपात प्रकरणी दोन आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद !

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील दोन आधुनिक वैद्य विजयसिंह भगत आणि सुखदेव कदम यांच्यावर ९ महिलांचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अकोला येथे धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात शासनाकडे तक्रार !

गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळण्याच्या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्‍या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना नि:शुल्क आणि सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा उपलब्ध करणे आदी गोष्टी बंधनकारक आहे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now