मंकीपॉक्सचा भारतात पहिला बळी !

नवी देहली – केरळचा २२ वर्षीय तरुण हा ‘मंकीपॉक्स’ या आजाराचा भारतातील पहिला बळी ठरला आहे. हा तरुण काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती येथे जाऊन आला होता. तेथेच त्याला याची लागण झाली होती.

२७ जुलै या दिवशी रुग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २० जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

या आजाराला आफ्रिका खंडाच्या बाहेर बळी पडलेली ही चौथी व्यक्ती आहे. मंकीपॉक्सचा मृत्यूदर अत्यल्प असला, तरी गेल्या मासात जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले होते.