१. एका शासकीय रुग्णालयात ‘एम्.आर.आय.’ चाचणीसाठी गेलेल्या रुग्णांना ६ घंट्यांपेक्षा अधिक वेळ ताटकळत रहावे लागणे
‘मी मुंबईतील एका शासकीय रुग्णालयात ४.१२.२०२१ या दिवशी उपचारांसाठी गेले होते. आधुनिक वैद्यांनी मला होत असलेल्या त्रासाविषयी ऐकल्यावर मला ‘एम्.आर्.आय्.’ आणि ‘सी.टी.स्कॅन’ करायला सांगितले. (‘एम्.आर्.आय्.’ (Magnetic Resonance Imaging) आणि ‘सी.टी.स्कॅन’ (Computed tomography) ही रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.) त्यांनी मला २ आठवड्यांनंतर ‘एम्.आर्.आय्.’ काढण्यासाठी बोलावले. मला सकाळी ७ वाजताची वेळ दिली होती. मी साडेसहा वाजता रुग्णालयात गेले. तेव्हा रांगेत माझ्यापुढे ५ रुग्ण होते. मी चौकशी केली असता कळले, ‘रुग्ण पहाटे ५ वाजल्यापासून रांगेत उभे रहातात आणि कर्मचारी सकाळी ८ वाजता येऊन ‘टोकन’ (प्रवेश क्रमांक) देतात. त्यानंतर ‘टोकन’ घेऊन आधुनिक वैद्यांकडे जाऊन त्यांची स्वाक्षरी घेतल्यावर पैसे भरायला जायचे. या सर्व कृती करायला ११ वाजतात. स्वतःचा क्रमांक येईपर्यंत मधेच रुग्णालयातील गंभीर रुग्ण आल्यास आपल्याला दुसर्या दिवशी बोलावतात. दुसर्या दिवशी पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागते.’
२. रुग्णालयातील कर्मचार्यांनी स्वतःची चूक दुसर्यावर ढकलणे आणि त्यात रुग्णाचे पैसे अन् वेळ वाया जाणे
रांगेत माझ्या पुढे असलेल्या एका रुग्ण महिलेच्या मानेचा ‘एम्.आर.आय.’ काढायचा होता. तो काढतांना मात्र तिच्या हाताचा ‘एम्.आर.आय.’ काढला गेला. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘एम्.आर.आय.’ काढणार्यांची चूक आहे’’, तर ‘एम्.आर.आय.’ काढणारे तंत्रज्ञ कर्मचारी म्हणाले, ‘‘आधुनिक वैद्यांची चूक आहे.’’ शेवटी त्या महिलेला पुन्हा ‘एम्.आर.आय.’ काढण्यासाठी ३ मासांनंतरचा दिनांक दिला. आधी काढलेल्या ‘एम्.आर.आय.’चे पैसेही त्या महिलेलाच भरावे लागले.
ही सर्व परिस्थिती पाहून माझे मन उद्विग्न झाले. त्या वेळी माझ्या मनात ‘हिंदु राष्ट्रातच या स्थितीत पालट होईल’, असे विचार आले. ‘देवा, हिंदु राष्ट्र शीघ्रातीशीघ्र येवो’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’
– श्रीमती गीता प्रभु (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१.५.२०२२)
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. आपणांसही वैद्यकीय क्षेत्रातील काही चांगले अथवा वरीलप्रमाणे कटु अनुभव आले असल्यास आम्हाला त्वरित कळवा. चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती ! : पैसे लुबाडणार्या आणि रुग्णांची फसवणूक करणार्या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. हिंदु राष्ट्रात केवळ सात्त्विक आधुनिक वैद्य आणि परिचारिका असतील. स्वतःचे अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१ संपर्क क्रमांक : ७७३८२३३३३३ ई-मेल पत्ता : [email protected] |