छत्तीसगडमधील जगदलपूर वैद्यकीय महाविद्यालयात सहस्रो उंदरांचा उच्छाद !

  • अनेक रुग्णांचा घेतला चावा !

  • उंदरांना मारण्यासाठी १० ते १२ लाख रुपयांचा खर्च !

बस्तर (छत्तीसगड) – बस्तर जिल्ह्यात असलेल्या जगदलपूर वैद्यकीय महाविद्यालयात सहस्रो उंदरांनी उच्छाद मांडला आहे. उदरांची ही संख्या अनुमाने ५ सहस्र असल्याचे सांगितले जात आहे. ७ सहस्र कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेल्या या महाविद्यालयातील रुग्णांसाठीचे ग्लूकोजही हे उंदीर पित आहेत. यासह यंत्रांच्या वायरीही कुरडत असून रुग्णांना त्रासही देत आहेत. अनेक रुग्णांनी तक्रार केली आहे की, उंदीर त्यांचा चावाही घेत आहेत.

उंदरांना मारण्याचे एका आस्थापनाला कंत्राट !

उंदरांना मारण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने चक्क निविदा काढून एका खासगी आस्थापनाला त्याचे काम दिले आहे. या कामासाठी १० ते १२ लाख रुपयांचा खर्च येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आस्थापन प्रतिदिन ५० उंदरांना ठार करून त्यांचे दफन करत आहे. गेल्या मासाभरात १ सहस्र ५०० उंदरांना मारण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

उंदरांचा त्रास चालू झाल्यावर त्यावर आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना का काढण्यात आली नाही ? याविषयी असंवेदनशील रहाणार्‍या उत्तरदायींकडून याचा खर्च वसूल करा !