मंकीपॉक्सचे ९९ टक्के रुग्ण समलिंगी अथवा उभयलिंगी ! – तज्ञ आधुनिक वैद्यांची माहिती

नवी देहली – ‘मंकीपॉक्स’चे ९५ ते ९९ टक्के रुग्ण हे समलिंगी किंवा उभयलिंगी (महिला आणि पुरुष दोघांशी शारीरिक संबंध ठेवणारे) आढळले आहेत. ‘मंकीपॉक्स’ संदर्भात अभ्यास करणार्‍या २ ख्यातनाम आधुनिक वैद्यांशी बोलल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, असे वृत्त ‘दिव्य मराठी’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.

भारतीय वैद्यकीय संस्थानच्या (‘आय.एम्.ए.’च्या) ‘कोविड टास्क फोर्स’चे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन् यांनी सांगितले की, समलिंगी अथवा उभयलिंगी व्यक्तींमध्ये ‘मंकीपॉक्स’ची साथ अधिक पसरत आहे. या समुदायात एका व्यक्तीचे अनेक लैंगिक जोडीदार असतात, हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे या समुदायातील लोकांनी सध्यातरी अनेक लैंगिक जोडीदार ठेवणे टाळणे आवश्यक आहे.