‘अमेरिकेच्या सैन्याकडे आपत्कालीन साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा केलेला असतो. सैन्याला यातील कोट्यवधी डॉलर्सची औषधे केवळ समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) झाली; म्हणून फेकून देऊन नवीन विकत घ्यावी लागत. हा अपव्यय टाळण्यासाठी अमेरिकच्या सैन्याने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाला औषधांच्या कालबाह्यतेविषयी अभ्यास करण्यास सांगितले.
या अभ्यासातून ‘१०० हून अधिक औषधांपैकी ९० टक्के औषधे त्यांच्या समाप्ती तिथीनंतर १५ वर्षांनीही वापरण्यासाठी उत्तम होती’, असे आढळून आले. ‘federal shelf life extension program’ असे ‘गूगल’ संकेतस्थळावर शोधल्यास याविषयी अधिक माहिती मिळेल.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२२)