सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेच्या वेळी कु. शर्वरी कानस्कर आणि तिची आई सौ. अनुपमा कानस्कर यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
नृत्यासाठी गाणे निवडतांना ‘नवरात्र चालू असल्याने सात्त्विक गाण्यांची निवड करावी. शुद्ध कथ्थकच्या ऐवजी देवीचे स्तुतीपर नृत्य बसवावे. अंजलीसाठी देवीची ‘मारक शक्ती’ दर्शवणारे नृत्य आणि शर्वरीसाठी आनंद अन् भाव व्यक्त होणारे ‘कृष्णाष्टकम्’ हे गाणे निवडावे’, असे विचार माझ्या मनात आले.