भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला सात्त्विक वातावरणात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक !
‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.