राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल ! – प्रवीण दरेकर

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्‍चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट लागू !

राज ठाकरे यांनI न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश

ऊर्जामंत्री आणि राज्य सरकार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मनसेची मागणी

वाढीव वीजदेयकांविषयीच्या भूमिकेत पालट करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकार यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंद करा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात वीजदेयक प्रकरणी फसवणूक केल्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तक्रार

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे २६ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यासाठी मनसेकडून २६ जानेवारीपर्यंत समयमर्यादा 

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

पेण बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा – मनसे

पेण शहरातील आदिवासी पाड्यात रहाणार्‍या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

इन्सुली येथील आर्टीओ कार्यालयात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावा; अन्यथा कारनामे बाहेर काढू ! – मनसेची चेतावणी

भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कोणती कारवाई चालू केली आहे ? इतरांना आंदोलने का करावी लागतात ?

भिवंडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोरंट वीज वितरण आस्थापनाची कार्यालये फोडली

आस्थापनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

मनसेच्या आवाहनाला ‘फ्लिपकार्ट’कडून प्रतिसाद, ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश

‘फ्लिपकार्ट’ या वस्तूंच्या ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश केला आहे. ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये मनसेकडून ‘फ्लिपकार्ट’ला आवाहन करण्यात आले होते.