भिवंडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोरंट वीज वितरण आस्थापनाची कार्यालये फोडली

मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालये फोडली.

भिवंडी – वाढीव वीज देयक, तसेच सक्तीची वीजदेयक वसुली, खोट्या वीज चोरीच्या पोलीस तक्रारी आणि टोरंट वीज वितरण आस्थापन मनमानी कारभार करत आहे, असा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ७ जानेवारी या दिवशी दुपारी येथील अंजूरफाटा भागातील ओसवालवाडी, तसेच वंजारपट्टी नाका भागातील चावींद्रा रास्ता येथील टोरंट वीज वितरण आस्थापनाची कार्यालये फोडली. या वेळी आस्थापनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. मनसेचे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.