मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट लागू !

  •  वाशी पथनाका तोडफोडीचे प्रकरण

  •  ६ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश

वाशी पथनाका

मुंबई – २६ जानेवारी २०१४ या दिवशी वाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी वाशी पथनाक्याची तोडफोड केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. या कारणास्तव राज ठाकरे यांच्या विरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट लागू केले असून त्यांना या प्रकरणी ६ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगूनही राज ठाकरे उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट लागू केले.